देहाची तिजोरी चे विडंबन
देहाची तिजोरी चे विडंबन
रोजचीच जोरी बायकोची मुजोरी
मरण धाड देवा आता मरण धाड देवा
काल तिने पूजा केली वट वृक्षाची
माझी कैद पक्की झाली सात जन्माची
खाष्ट बायकोच्या हातून घडे कशी सेवा
मरण धाड देवा आता मरण धाड देवा
सकाळी चहाच्या वेळी तिची दुखते पाठ
अंथरुणात पडल्या पडल्या जांभई दे दाट
तिची इच्छा एक आहे चहा मी करावा
मरण धाड देवा आता मरण धाड देवा
पिते चहा डोळे मिटुनी जाता बायकोची
मनी नवऱ्याच्या का रे भीती लाटण्याची
सरावल्या डोक्याला हि टेंगुळ का हो यावा
मरण धाड देवा आता मरण धाड देवा
तिच्या बोलण्याने माझी मोलकरीण गेली
घरातली सारी कामे माझ्या माथी आली
घराचा मी स्वामी असुनी दास का ठरावा
मरण धाड देवा आता मरण धाड देवा



